आयपीएलमध्ये क्रिकेटपेक्षा पैशांवरच फोकस, द. आफ्रिकेच्या डेल स्टेनचे मत

हिंदुस्थानातील आयपीएल ही टी-20 स्पर्धा जगातील सर्वात श्रीमंत व यशस्वी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जगातील प्रत्येक खेळाडू इच्छुक असतो.

यावेळी मात्र दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने आपले मत व्यक्त करताना म्हटले की, आयपीएलमध्ये क्रिकेटवर जास्त लक्ष दिले जात नाही. या स्पर्धेत खेळाडूंना मिळणाऱया पैशांवर अधिक फोकस असतो.

डेल स्टेनने आयपीएलमधल्या विविध संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात लायन्स या संघांचा समावेश आहे. त्यामुळे डेल स्टेनचे हे विधान धक्कादायक ठरले आहे.

आयपीएलमध्ये मोठय़ा संघांचा समावेश असतो. जगभरातील नामवंत खेळाडू यामध्ये सहभागी होतात. या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर खेळाडूंना किती रक्कम मिळते याचीच चर्चा सर्वत्र रंगू लागते. त्यामुळे मूळ क्रिकेटचा विसर पडतो. जगभरातील इतर लीगमध्ये मात्र क्रिकेट या खेळाकडेच फोकस केला जातो.

आपली प्रतिक्रिया द्या