तुम्हाला माहिती आहे का? डेल स्टेनने एका प्रसिद्ध हॉलीवूड चित्रपटात अभिनय केला होता

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज आणि ‘स्टेनगन’ या नावाने क्रिकेट विश्वात प्रसिद्ध असलेल्या डेल स्टेन याचा आज 37 वा वाढदिवस आहे. 27 जून 1983 ला जन्मलेल्या स्टेनने आपल्या वेगाने क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहिला. स्टेनच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्याचा 150 च्या स्पीडने येणारा आणि स्विंग होणारा चेंडू फलंदाजांच्या मनात धडकी भरवतो.

लहानपणी क्रिकेट ऐवजी स्केटबोर्डिंगचा दिवाना असणारा स्टेनने फलबोरवा येथून प्रिटोरिया येथे राहायला आला आणि त्याची क्रिकेटमध्ये रुची वाढली. उंचापुरा, मोठाले डोळे, आक्रमक सेलिब्रेशन करणाऱ्या स्टेनने प्रथमश्रेणीकॅगे फक्त 7 सामने खेळले आहेत. यानंतर त्याला थेट राष्ट्रीय संघात स्थान मिळाले.

2004 मध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या स्टेनला पहिल्या मालिकेत विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याला संघातून डच्चू मिळाला. यानंतर त्याने कौंटी क्रिकेटकडे मोर्चा वळवला आणि दमदार प्रदर्शन करत पुन्हा संघाची कवाडे उघडली. 2008 पर्यंत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 100 बळी पूर्ण केले आणि याच वर्षी त्याला ‘आईसीसी प्लेयर ऑफ ईयर’ पुरस्कार मिळाला. 2018 मध्ये तो आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासात सर्वाधिक कसोटी बळी घेणारा खेळाडू ठरला.

2019 मध्ये पोर्ट एलिजाबेथ येथे श्रीलंकेविरुद्ध स्टेन आपला अखेरचा कसोटी सामना खेळला. स्टेनने 93 कसोटीत 439 बळी घेतले आहेत. कसोटीला रामराम केला असला तरी एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट मात्र तो खेळणार आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 125 लढतीत 196 बळी तर 47 टी-20 लढतीत 64 बळी घेतले आहेत.

प्रसिद्ध हॉलीवूड चित्रपटात अभिनय केला
क्रिकेटच्या मैदानात संघासाठी हिरो ठरणाऱ्या डेल स्टेन याने एका प्रसिद्ध हॉलीवूड चित्रपटात अभिनय केला आहे. 2014 रोजी आलेल्या ब्लेंडेड (Blended) या कॉमेडी चित्रपटात त्याने अभिनय केला होता. यात त्याची क्रिकेटपटूची भूमिका होती.

आपली प्रतिक्रिया द्या