पाणी पुरवठ्यासाठी तरुणांनी टाकल्या धरणात उड्या

सामना ऑनलाईन । बीड

बीड जिल्ह्यातील माजलगाव शहर परिसरातील ११ पुनर्वसित गावातील पाणी प्रश्न सुरळीत करावा मागणीसाठी या गावातील ११ तरुणांनी शनिवारी ११ वाजता धरणातील पाण्यात उड्या घेतल्या. खानापूर, शेलापुरी, रेनापुरी, देवखेडा, चिंचगव्हाण, नांदूर, पुनंदगाव, ब्रह्म गाव, मनुर, मनुरवाडी, काडीवडगाव या गावांतील पाणीपुरवठा नगर परिषदेबरोबर संयुक्त आहे.

वीज बिलापोटी परिषेदीने या गावांचा पाणीपुरवठा २० दिवसापासून बंद केल्याने तो सुरू करावा यासाठी शनिवारी
मुक्तीरांम आबुज,पंडित आबुज,गजानन आबुज,पवन मूळे,विकास कांबळे,अनिल कांबळे,सचिन गात्वे, पांडुरंग आबुज, विनोद आबुज, गणेश मारगुडे, शिवाजी आबुज या तरुणांनी सकाळी ११ वाजता धरणात उड्या टाकल्या. या उड्यांच्या माध्यमातून या तरुणांनी आंदोलन सुरू केलं असून या प्रकरणी पोलिसांनी गटविकास अधिकारी बी. टी. चव्हाण यांना बोलावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या