संगमेश्वरवासीयांचे ग्रामदैवत पुरातन जाखमाता मंदिरावर झाड कोसळल्यामुळे नुकसान

मुंबई-गोवा महामार्गालगत पैसा फंड इंग्लिश स्कूलजवळ असणारे जाखमाता मंदिर हे संगमेश्वरवासीयांचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. कालपासून संगमेश्वर परिसरात वादळामुळे रिमझिम पाऊस सुरू आहे. आज सकाळी जोरदार वादळी वाऱ्यामुळे जाखमाता मंदिरावर आंब्याचे झाड कोसळून मंदिराचे नुकसान झाले आहे.

महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने मंदिराच्या प्रवेशद्वाराकडील बराचसा भाग तोडण्यात आला असतानाच आज वादळी वाऱ्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत मंदिराजवळ असणारे आंब्याचे मजबूत झाड उन्मळून त्याचा काही भाग मंदिराच्या छपरावर पडल्याने कौले फुटून लोखंडी ॲंगल वाकले आहेत. वादळाचा फटका मंदिराच्या सभामंडपाला बसल्याने ग्रामदैवत असलेल्या जाखमाता मंदिराची आता मोठी डागडुजी करावी लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या