लोक घोडेस्वारी करतात, पण या पठ्ठ्याने घोड्यालाच खांद्यावर उचललं! पाहा व्हिडीओ

काहींना घोडेस्वारीचा नाद असतो, काहींना उंटावर स्वार व्हायला आवडतं. पण, कधी तुम्ही घोडा स्वार झालेला माणूस पाहिला आहे का? ही अशक्य वाटणारी गोष्ट एका माणसाच्या बाबतीत खरी ठरली आहे.

दमित्री असं या माणसाचं नाव आहे. मूळचा युक्रेनचा रहिवासी असलेल्या दमित्री आपल्या अचाट आणि अफाट कारनाम्यांसाठी प्रसिद्ध आहे. एक दोन नव्हे तर चक्क 60 वेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दमित्रीचं नाव नोंदवण्यात आलं आहे.

याचं कारणही तसंच आहे. दमित्री हा जगातील सर्वात शक्तिशाली लोकांपैकी एक समजला जातो. त्याची शारीरिक ताकद प्रचंड आहे. सध्या त्याचा घोड्याला पाठीवर उचलून घेत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दमित्री यापूर्वी सर्कशीत काम करत असे आणि त्यावेळी तो आपल्या हातांनी 152 किलोचं वजन उचलू शकत असे. त्याच्यावरून माणसांनी भरलेल्या गाड्याही पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, त्याची ताकद प्रचंड असल्याने त्याला काहीही दुखापत होत नाही.

दमित्री दातांनी लोखंडी रॉड वाकवू शकतो. घोडाच नव्हे तर इतरही वजनदार जनावरं तो उचलू शकतो. सोशल मीडियावर सध्या त्याच्या या अचाट आणि भन्नाट कारनाम्यांची चर्चा सुरू आहे.

दमित्रीने घोड्याला उचलून घेतल्याचा एक व्हिडीओही व्हायरल होत असून नेटकरी त्या व्हिडीओला तुफान प्रतिसाद देत आहेत. दमित्रीच्या कारनाम्यामुळे नेटकऱ्यांमध्ये त्याच्याविषयीची उत्सुकता वाढली आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या