नृत्यसाधना

68

>>प्रतिनिधी<<

तरुणांना नृत्यकलेत करीअर करण्याच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. ही फक्त एक कला नसून ती साधना आहे याचेही भान विद्यार्थ्यांना नृत्यकला आत्मसात करताना ठेवावे लागते.

नृत्यशास्त्रआपल्या पारंपरिक हिंदुस्थानी संस्कृतीची ओळख करून देणारे व्यापक क्षेत्र… इतर क्षेत्रांप्रमाणे नृत्यालाही आज होणाऱया लाइव्ह शोमुळे महत्त्व प्राप्त झाले आहे… तरुणांना नृत्यकलेत करीअर करण्याच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. ही फक्त एक कला नसून ती साधना आहे याचेही भान विद्यार्थ्यांना नृत्यकला आत्मसात करताना ठेवावे लागते.

प्रत्येकाच्या आवडीनुसार कथ्थक, भरतनाटय़म असा कोणताही शास्त्र्ााrय नृत्यप्रकार विद्यार्थी शिकू शकतात. आज अनेक नामांकित विद्यापीठांमध्ये नृत्यामध्ये पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेता येते. नृत्यवर्ग व्यवसाय म्हणून स्वीकारणाऱयांना इतरांना शिकवण्याची आवड असावी लागते. अगदी लहान मुलींपासून ते मोठय़ा व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला समजेल अशा भाषेत नृत्याची ओळख करून द्यावी लागते. यामध्ये परफॉर्मिंग, टीचिंग आणि कोरिओग्राफी असे तीन विभाग आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिक आणि शारीरिक क्षमताही चांगली असावी लागते.

पदवी मिळवल्यानंतर कोणाला सादरीकरण करण्यात रस असतो, कोणाला कोरिओग्राफी करण्यात, तर कोणाला नृत्य शिकवण्यामध्ये. प्रत्येकाच्या आवडीनुसार विद्यार्थी त्या त्या क्षेत्रात काम करू लागतात.  पदवी मिळाले म्हणून शिक्षण झाले असे नसून मेहनत आणि रियाजामध्ये सातत्य ठेवावे लागते.

आवश्यक गुण

रंगमंचीय ज्ञान, वेशभूषेचे ज्ञान, सादरीकरणाची वैशिष्टय़पूर्ण शैली, चेहऱयावरील हावभाव, शारीरिक ठेवण, मानसिकदृष्टय़ा सक्षम असे गुण नृत्य शिकणाऱयामध्ये असणे आवश्यक आहे.

 

शास्त्रीय नृत्याचे प्रकार

>भरतनाटय़म       :   तामीळनाडू

>कथकली      :   केरळ

>कथ्थक :   मणिपूर

>कुचिपुडी      :   आंध्र प्रदेश

>ओडिसी       :   ओरिसा

>मोहिनीअट्टम    :   केरळ

नृत्य संस्था

>कथ्थक नृत्यशाळा, अहमदाबाद

>अ.भा. गंधर्व महाविद्यालय, मुंबई

>भरतनाटय़म सांस्कृतिक आणि प्रशिक्षण केंद्र

>रस नृत्य संस्था, मुंबई

आपली प्रतिक्रिया द्या