आमीरची चीनमध्ये ‘दंगल’, तीन दिवसांत जमवला ७२ कोटींचा गल्ला

सामना ऑनलाईन, मुंबई

मि. परफेक्शनिस्ट आमीर खानचा बहूचर्चित ‘दंगल’ हा चित्रपट या आठवड्यात चीनमध्ये प्रदर्शित झाला आहे. हिंदुस्थानप्रमाणे चीनच्या बॉक्स ऑफीसवरदेखील आमीरची दंगल पाहायला मिळत असून अवघ्या तीन दिवसांत दंगल या चित्रपटाने तब्बल ७२ कोटींचा गल्ला जमवला आहे.

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. दंगल हा चित्रपट चीनमधील तब्बल ७ हजार स्क्रिनवर रिलीज झाला आहे. यापूर्वी आमीरच्या ‘थ्री इडियट’ आणि ‘पीके’ या चित्रपटानेही चीनमध्ये तगडी कमाई केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या