अजबच! बरं होण्यासाठी येथे 130 लिटर कच्च्या तेलाने आंघोळ करतात

सामना ऑनलाईन । नाफतलान

जगभरामध्य़े रोग बरा करण्यासाठी रुग्णावर वेगवेगळ्या प्रकारे उपचार करण्याच्या पद्धती वापरल्या जातात. काही लोकं

अंधश्रद्धेला प्राधान्य देतात तर काही विज्ञानाला तर काही आर्युर्वेदाला. परंतु जगातील एका देशामध्ये अशी उपचार पद्धती वापरली जाते जी वाचून तुमचा क्षणभर विश्वासही बसणार नाही. इराणच्या जवळच्या अजरबेजान या छोट्या देशामध्ये उपचारासाठी लोकं कच्च्या तेलाने आंघोळ करतात.

अजरबेजान हा तेल जगभरातील एक मोठा तेल उत्पादक देश आहे. या देशातील नाफतलान नावाच्या एका शहरामध्ये लोकं उपचारासाठी कच्च्या तेलाने आंघोळ करतात. या शहरात याचे एक हेल्थ सेंटरही आहे. या ठिकाणी रुग्णांना कच्च्या तेलाने भरलेल्या बाथटबमध्ये आंघोळ घातली जाते. शहरातील या अजब हेल्थ सेंटरमध्ये स्किनबाबतच्या समस्यांवर उपचार केले जातात. तसेच आर्थरायटिसच्या उपचारासाठीही लोकं याठिकाणी येतात.

बाथटबमध्ये कच्चे तेल ओतून यात रुग्णाला आंघोळ घालण्याव्यतिरिक्त अन्यही काही उपचार पद्धतींचा वापर या हेल्थ सेंटरमध्ये होतो. परंतु बाथटबमधील उपचार पद्धती अधिक लोकप्रिय आहे. यात ४० डिग्रीच्या गरम कच्च्या तेलामध्ये रुग्णाला जवळपास १३० लिटर तेलाने आंघोळ घातली जाते. तब्बल १० दिवसांचा हा कोर्स आहे. रुग्णाला एका दिवशी १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ कच्च्या तेलाने आंघोळ घातली जात नाही. या प्रकाराच्या उपचारांमध्ये अधिक सावधानता बाळगावी लागते.

हेल्थ सेंटरमधील एका तज्ज्ञाच्या मते जवळपास ७० पेक्षा अधिक रोगाचा उपचार या पद्धतीने केला जातो. रशिया, कझाकिस्तान आणि जर्मनीसारख्या देशांमधून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेण्यासाठी येथे येत असतात. गरम कच्च्या तेलामध्ये आंघोळ केल्याने हाडांच्या समस्येतून मुक्तता मिळत असे येथे येणारे लोकांचे म्हणणे आहे. परंतु या कच्च्या तेलामध्ये अनेक प्रकारचे केमिकल असण्याची शक्यता असल्याने याचा स्किनवर वाईट प्रभाव पडू शकतो किंवा जास्त वेळ गरम तेलात आंघोळ केल्याने मृत्यूही होऊ शकतो असे काही तज्ज्ञांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या