दानिश कानेरियाचे शाहिद आफ्रिदीवर गंभीर आरोप

पाकिस्तानचा माजी गोलंदाज दानिश कानेरियाने त्याच्यासोबत संघात भेदभाव झाल्याचे आरोप याआधी केले होते. त्यावेळी त्याने लवकरच त्याला वाईट वागणूक देणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर करणार असेही सांगितले होते. त्यानुसार शनिवारी दानिश कानेरियाने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीविरोधात गंभीर आरोप केले आहे.

shahid-afridi-1

‘शाहिद आफ्रिदीने मला माझ्या पूर्ण करिअर मध्ये कधीच चांगली वागणूक दिली नाही. तो काय माझ्यासोबत भेदभाव करायचा. तोच माझं करिअर संपण्यासाठी जबाबदार आहे. तो माझ्या विरोधात असायचा. आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशाअंतर्गत कुठेही खेळताना तो कायम माझ्या विरोधातच असायचा. मला विरोध करण्यासाठी त्याच्याकडे फक्त एकच कारण होतं. ते म्हणजे माझा धर्म. त्याच्यामुळेच मी एकदिवसीय सामने जास्त खेळू शकलो नाही. देशाअंतर्गत क्रिकेटमध्येही तो मला बसवून ठेवायचा. तो इतरांना पाठिंबा द्यायचा. मी व तो दोघेही लेग स्पिनर होतो. त्यामुळे देखील तो मला संघापासून दूर ठेवायचा प्रयत्न करायचा’, असे कानेरियाने सांगितले.

हिंदू असल्याने दानिश कनेरियाला दिली जायची तुच्छ वागणूक, शोएब अख्तरचा खळबळजनक खुलासा

फिरकी गोलंदाज असलेल्या दानिशला संघातील इतर खेळाडूंकडून तुच्छ वागणूक दिली जायची असा धक्कादायक खुलासा पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याने काही दिवसांपूर्वी केला होता. इंग्लंडमध्ये आम्ही एक सिरीज खेळत होतो. तेव्हा लंच ब्रेकला सर्वजण जेवत होते. दानिश देखील जेवण वाढून घ्यायला गेला. तेव्हा संघातील काही खेळाडूंनी मला विचारले की हा कसा आपल्याला ठेवलेले जेवण जेवतोय. ते ऐकून मला भयंकर राग आला. मी त्या खेळाडूला चांगलेच खडसावले. म्हटलं तू कर्णधार असशील तो मैदानावर. इथे उगाच वरचढ बनू नकोस. त्याने सहा सहा विकेट घेऊन सामना जिंकून दिलाय’, असे शोएबने सांगितले होते.

आपली प्रतिक्रिया द्या