दापोली पंचायत समितीचे सभापती रहुप हजवाणी यांनी घेतली शिवसेना नेते रामदास कदम यांची भेट

दापोली पंचायत समितीचे सभापती रहुप हजवाणी यांनी शिवसेना नेते रामदास कदम आणि दापोली विधासभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांची मुंबईत भेट घेतली. त्यामुळे दापोलीच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

दापोली पंचायत समितीचे सभापती रहुपभाई हजवाणी यांनी शिवसेना नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्या मुंबई कांदिवली येथील पालखी बंगला निवासस्थानी भेट घेतली. तर हजवाणे यांच्या पत्नी सुलताना रहुप हजवाणी यांनी शिवसेनेत प्रवेश केला या प्रकाराने दापोलीच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. हर्णे पंचायत समिती गणातून पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडून आलेले रहुप हजवाणी हे दापोली पंचायत समितीचे विदयमान सभापती आहेत, तर दापोली तालूका राष्ट्रवादी काँग्रेसचे विदयमान तालूका उपाध्यक्ष आहेत. तसेच ते माजी आमदार संजय कदम यांचे समर्थक मानले जात होते. आज मुंबईत जाऊन शिवसेना नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांची तालूक्यातील विकास कामांसाठी भेट घेतली.

 

आपली प्रतिक्रिया द्या