दास नवमीचा उत्सव

28

विजय दिघे

रायगड जिह्यातील रामदास पठार, तेथील मठ आणि पठाराच्या पायथ्याशी असलेली समर्थ घळ या निसर्गरम्य ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व वेगळे सांगायला नको. येथील विहिरही पाहाण्यासारखी आहे. हा सगळा अनुभव घ्यायचा तर तेथे प्रत्यक्ष भेट द्यायलाच हवी. दासनवमी निमित्त १४ फेब्रुवारीपासून येथे मोठा उत्सव सुरू होत असून तो थेट २० फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यात अखंड नामयज्ञ, गुरुग्रंथ दासबोधाचे पारायण, समर्थांची काकड आरती, पारायण, हरीपाठ, हरीकीर्तन असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

रामदास पठाराच्या पायथ्याशी असलेल्या घळीचा शोध आळंदीचे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी ११ एप्रिल २००९ या दिवशी लावला. या घळीचा समोरचा आकार सुमारे १० फूट उंच असून आतील भागाची उंची सुमारे ४० फूट एवढी आहे. घळीच्या आतील बांधलेल्या भिंतींना काही खण दिसून येतात. आतल्या भागात देवघर असावे असा उंचवठा दिसून येतो. घळीमध्ये प्रवेश केल्यावर समोरच समर्थ रामदासांची बसण्याची जागा दिसून येते. हे सगळं अनुभवायचं तर तेथे प्रत्यक्ष जाण्यावाचून पर्याय नाही.

दरवर्षीप्रमाणे यंदाही समर्थांची ४०७ वी पुण्यतिथी (श्री दासनवमी) मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त येथील गावकऱ्यांनी भाविकांच्या जेवणाची व राहण्याची सोय समर्थमठात केली आहे. अधिक माहितीसाठी ९८३३६६४६८२ किंवा ७३०३००५१३८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या