दसरा मेळाव्याला गर्दी जमवली; पंकजा मुंडे, खासदार कराड यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल

पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे दसऱयाच्या दिवशी गर्दी जमवून जिल्हाधिकाऱयांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय महामंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर, खासदार भागवत कराड, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार मोनिका राजळे व इतर 50 जणांवर रविवारी रात्री अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दोन वर्षांपासून पंकजा मुंडे या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे संत भगवान बाबांच्या जन्मस्थळी दसरा मेळावा घेतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा ऑनलाईन झाला. जिह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू असतानाही शेकडो समर्थक जमल्याने हे गुन्हे दाखल करण्यात आले.

या कलमान्वये गुन्हे नोंद

कलम 188, 269, 270 आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (ब) या कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या