राफेल: ऑडिओ क्लिपनंतर राहुल गांधींचा ई-मेल बॉम्ब, अनिल अंबानींनाच कंत्राट देण्याचे आदेश होते!

26
rahul-gandhi-modi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राफेल करारावरून संसदेत सुरू असलेला गदारोळ थांबण्याचे नाव घेत नाही. काँग्रेसकडून मोदी सरकारवर हल्ले सुरूच आहेत, तर भाजपकडूनही प्रति हल्ले सुरू आहेत. कालच्या ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दसॉल्ट कंपनीचे लिक झालेले ई-मेल जाहीर करत मोदींना पुन्हा लक्ष्य केलं आहे.

राफेल करारात महत्वाची भूमिका असणाऱ्या फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीचे अंतर्गत इमेल लीक झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन केला. हिंदुस्थान सरकारने ऑफसेट कॉन्ट्रॅक्ट हा केवळ अनिल अंबानी यांच्याच कंपनीला देण्यात यावा असे आदेश दिल्याचे या ई-मेलमधून स्पष्ट होत आहे, असे ठामपणे सांगतानाच पंतप्रधान मोदी यांनी अनिल अंबानी यांना 30 हजार कोटी रुपये दिल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला आहे.

दरम्यान, संसदेतही यावरून दोन्ही बाजूंनी आरोपप्रत्यारोप सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या