लातूर जिल्ह्यातील तपसे चिंचोलीत दत्त जयंती सोहळ्याला सुरुवात

234

सामना ऑनलाईन, लातूर

लातूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र तपसे चिंचोली येथे दत्त जयंती सोहळ्याला २३ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. हा सोहळा ४ डिसेंबरपर्यंत चालणार असून या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प.पू सद्गुरू सौ.महानंदा माताजी यांच्या अनुष्ठानानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा हा या दत्त जयंती उत्सवातील प्रमुख भाग आहे. या सोहळ्याला छत्रपती संभाजीराजे भोसले, लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांनी श्री क्षेत्र तपसे चिंचोली येथे उपस्थिती लावायला सुरुवात केली आहे. सोहळ्याची सांगता ह.भ.प.केशवदादा महाराज उखळीकर यांच्या काल्याचे कीर्तन व महाप्रसादने होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन बालअवधूत भागवताचार्य दत्तात्रय महाराजजी  यादव आणि समस्त ग्रामस्थ तपसे चिंचोली यांच्या वतीने करण्यात आले आहे

आपली प्रतिक्रिया द्या