दत्त मंदिरचा राजाने पटकावले जेतेपद

31

सामना ऑनलाईन । सांताक्रुझ

शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या पुढाकाराने आणि निसार बारुदगर, निशांत घाडीगावकर, सुदीप पवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत दत्त मंदिराचा राजा क्रिकेट संघाने जेतेपदाला गवसणी घातली. दत्त मंदिराचा राजा संघाने जेतेपदाच्या लढतीत वायएनसीसी संघावर दमदार विजय मिळवत झळाळता करंडक पटकावला. यावेळी संजय दाभोळकरची सर्वोत्तम फलंदाज म्हणून तर विजय पुजारीची सर्वोत्तम गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली. चंदन मानेच्या गळ्यात मालिकावीराची माळ पडली.

३२ संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला.  शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत आणि महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या