कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द करा; रोइंगपटू दत्तू भोकनळची याचिका

30

सामना प्रतिनिधी, मुंबई

पत्नीने केलेल्या आरोपावरून कौटुंबिक हिंसेचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या हिंदुस्थानचा आघाडीचा रोइंगपटू दत्तू भोकनळ याने हायकोर्टात धाव घेतली आहे. येत्या 2 ऑगस्टला ऑस्ट्रियात होणाऱया आंतरराष्ट्रीय रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी व्हायचे असल्याने आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी भोकनळ याने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या बुधवारी सुनावणी घेण्यात येणार आहे.

ऑलिम्पियन आणि आशियाई खेळात सुवर्ण पदक पटकावलेल्या दत्तू भोकनळविरुद्ध नाशिक पोलीस दलात असलेल्या त्याच्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे. 22 डिसेंबर 2017 ते 3 मार्च 2018 या दरम्यान आपल्या पतीने मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. दत्तूने हिंदू वैदिक पद्धतीने विवाह केल्यानंतर रीतसर लग्न करण्याचे दोन वेळा आश्वासनही दिले; परंतु रीतसर लग्न अद्यापही केले नाही असे या तक्रारीत म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या