मुलीच्या अफेयरच्या संशयावरून निवृत्त जवानाचा कुटुंबीयांवर गोळीबार, मुलीने केली हत्या

1125

लष्करातून निवृत्त झालेल्या माजी जवानाने रागाच्या भरात कुटुंबीयांवर गोळीबार केल्याने त्याच्या मुलीने त्याची गोळ्या घालून हत्या केली आहे. उत्तर प्रदेशमधील मथुरा जिल्ह्यातील मिथौली गावात ही घटना घडली. या घटनेत जवानाची मुलगी व पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.

चेताराम सिंग असे त्या निवृत्त जवानाचे नाव असून त्यांनी जाट रेजिमेंटमध्ये नाईक पदावर काम केले आहे. 41 वर्षीय चेताराम यांनी सहा वर्षांपूर्वी लष्करातून निवृत्ती घेतली होती. चेतारामची मुलगी ही अलाहाबाद येथे शिक्षण घेत होती तर त्याचा मुलगा मथुरा येथील शाळेत नववीत शिकत होती. चेतारामला त्याच्या मुलीचे अफेयर असल्याचा संशय आल्याने त्याने मुलीला घरी बोलावले होते. त्यावरून त्याचे पत्नी व मुलीसोबत वाद सुरू होते. यावेळी रागाच्या भरात चेतारामने त्याच्याकडील खासगी पिस्तूलने पत्नी व मुलीवर गोळीबार केला. यात त्या दोघी जखमी झाल्या. त्यानंतर त्याने पिस्तूल मुलाकडे रोखली असता त्याच्या मुलीने त्याच्या हातातील पिस्तूल खेचून घेतले व त्याच्यावरच गोळीबार केला. या गोळीबारात चेताराम जागीच ठार झाला. त्यानंतर मुलाने आईला व बहिणीला रुग्णालयात दाखल केले. तेथे त्या दोघींवर उपचार सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या