नसिरुद्दीन शहा यांच्या मुलीने केली महिलांना मारहाण

1138

ज्य़ेष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांची मुलगी हीबा शहा यांनी मुंबईतील एका पशूवैद्यकीय रुग्णालयात दोन महिलांना मारहाण केली आहे. वर्सोवा येथील रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये हिबा विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रुग्णालयाने देखील फुटेज वर्सोवा पोलिसांना दिले आहेत.

रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, ’16 जानेवारीला दुपारी तीनच्या सुमारास हिबा तिच्या मैत्रिणीच्या दोन मांजरी घेऊन फेलिना फाऊंडेशनतर्फे चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयात आली होती. त्यावेळी तेथील केअरटेकरने त्यांना पाच मिनिटं थांबायला सांगितले. 2 ते 3 मिनिटं थांबल्यानंतर हिबा यांनी तेथील कर्मचाऱ्यांसोबत वाद घालायला सुरवात केली. त्यांनी त्यांना विचारले की तुम्ही मला ओळखत नाही का? त्यानंतर त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी दोन महिला कर्मचाऱ्यांच्या कानाखाली मारल्या’

हिबा यांनी देखील मारहाण केल्याचे मान्य केले आहे. मात्र सुरुवात त्यांच्याकडून झाली होती. त्यांनी मला रुग्णालयात येऊ दिले नाही. त्यानंतर अनेक प्रश्न विचारले. तेथील कर्मचाऱ्यांनी मला शिवीगाळ केली, मला धक्का मारला. त्यामुळे मी त्यांना मारले.

आपली प्रतिक्रिया द्या