वडिलांच्या संपत्तीवर मुलीचाही हक्क; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

1796
supreme-court

वडिलांच्या संपत्तीत मुलीला मुलाप्रमाणेच समान वाटा दिला जावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हिंदू वारसाहक्क दुरुस्ती कायदा 2005 नुसार वडील हयात असतील किंवा नसले तरी मुलीला संपत्तीत समान हक्क मिळेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

हिंदू वारसा कायद्याच्या कलम-६मध्ये दुरुस्ती करून 9 सप्टेंबर 2005 रोजी वडिलोपार्जित संपत्तीत मुलांच्या बरोबरीने मुलींनाही समान भागीदार म्हणून हक्क देण्यात आला. परंतु कायदा दुरुस्ती अस्तित्वात आली त्यापूर्वी म्हणजेच 2005च्या आधी वडिलांचा मृत्यू झाला असेल, तर मुलींना याचा लाभ मिळेल की नाही, हे स्पष्ट नव्हते. याबाबत न्यायमूर्ती अरुण मिश्रा, एस अब्दुल नजीर आणि एम.आर. शाह यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत वडिलोपार्जित संपत्तीत मुलीला समान अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

आधी काय होता नियम

मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळण्याबाबत हिंदू वारसा हक्क कायदा-1956 हा कायदा होता. यानुसार वडिलांच्या संपत्तीत मुलीला वगळून वाटणी व्हायची. त्यानंतर वडिलांना जो वाटा मिळाला असेल त्यांची पुन्हा मुलांच्या संख्येनुसार वाटणी व्हायची आणि त्यात सर्व मुलांना समान हिस्सा मिळायचा.

आता काय झाला बदल

केंद्र सरकारने 1956 मधील हिंदू वारसा हक्क कायदा 2005 मध्ये सुधारणा करत वडिलोपार्जित संपत्तीत मुलीला समान अधिकार दिला. परंतु वडिलांचं निधन झालं असेल तर लाभ मिळेल की नाही हे स्पष्ट नव्हतं. आता हा मुद्दा कायमचा वगळण्यात आला आहे. त्यामुळे वडिलांच्या संपत्तीत आता मुलींना हक्काने वाटा मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या