परिपूर्ण विजय! सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आनंदी

सनरायझर्स हैदराबादने गुरुवारी राजस्थान रॉयल्सला आठ गडी व 11 चेंडू राखून हरवले आणि आयपीएलमध्ये महत्त्वाचे दोन गुण संपादन केले. यावेळी फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबींमध्ये सरस कामगिरी करीत राजस्थान रॉयल्सला हरवणाऱया सनरायझर्स हैदराबादच्या कामगिरीवर कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने आनंद व्यक्त केला. यावेळी तो म्हणाला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत आम्ही जबरदस्त खेळ केला. आयपीएलमधील हा आमचा परिपूर्ण विजय ठरला.

खेळपट्टीवर उभे राहून फटके खेळायचे होते – मनीष पांडे

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत मला खेळपट्टीवर उभे राहून धावा करायच्या होत्या. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर सावध पवित्रा घ्यायचा हे ठरवले होते. अखेर विजय शंकरच्या साथीने संघाला विजय मिळवून देता आला. त्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झालाय असे ‘सामना’वीर ठरलेला मनीष पांडे यावेळी म्हणाला.

मालवणी तडका (हैदराबाद – राजस्थान लढत)

हैदराबादवाल्यांनी बॉलिंग घेतली…राजस्थानचा संघ 154 वर थांबला… हैदराबादचो पाठलाग… आर्चरने पयली दोन कलमा स्वस्तात लायल्यानं… पण मगे मनीष पांडे आणि विजय शंकरची अगदी सहज भागी… हैदराबादने केलेलो पाठलाग खूपच सहज, बादल चौधरीच्या शब्दांत जणू – ‘उडान फोडणी आणि चावान कांदो…’
(टीप – लेखक मालवणी समालोचक आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या