वॉर्नर-डी कॉक भिडले, व्हिडीओ व्हायरल

सामना ऑनलाईन । डरबन

ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला डरबन कसोटीत ११८ पराभूत केलं, मात्र हा कसोटी सामना वेगळ्याचा कारणावरून चर्चेत आला आहे. ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार आणि दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर, फलंदाज क्विंटन डी कॉक यांच्यातील ड्रेसिंग रुममध्ये जातानाच्या भांडणाचा हा व्हिडीओ आहे. भांडणाचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

भांडणाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) चौकशी सुरू केली आहे. वॉर्नर व्हिडीओत अत्यंत रागात दिसत आहे आणि तो डी कॉकवर रागावताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ वॉर्नरला शांत करताना दिसत आहे. भांडणादरम्यान दोन्ही संघांचे खेळाडूही त्याठिकाणी उपस्थित होते. अखेर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसीने मध्यस्थी करून वॉर्नरला शांत करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान डी कॉक संयम राखत शांत होता.

वॉर्नर, डी कॉकवर कारवाईची शक्यता
सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर दोन्ही खेळाडूंवर कारवाई होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेच्या आउटलेट इंडिपेन्डेन्ट मीडियाने हा व्हिडीओ सर्वात आधी प्रसारीत केला.

वॉर्नरने जो रूटला मारला होता ठोसा
इंग्लंडचा सध्याचा कर्णधार जो रूटला २०१३मध्ये वॉर्नरने ठोसा मारला होता. एका हॉटेलमध्ये त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली होती, तेव्हा रागात वॉर्नरने रूटला ठोसा मारला होता