दावोस परिषद- महाराष्ट्रात 45 हजार कोटींची गुंतवणूक

स्वित्झर्लंडमधील दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात 45 हजार 900 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. यातून दहा हजार लोकांना प्रत्यक्षपणे रोजगार मिळेल असा दावा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक पह्रमच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले असून त्यांनी दावोस येथे उभारण्यात आलेल्या सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. यावेळी पाच विविध पंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून यातून सुमारे दहा हजार तरुणांच्या हाताला काम मिळेल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.