‘डी कंपनी’चा हिंदुस्थानला मोठा धोका, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेपुढे हिंदुस्थानचा दावा

61

सामना प्रतिनिधी ।  संयुक्त राष्ट्र

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा दहशतवादी चेहरा हिंदुस्थानने नव्याने जगासमोर आणला आहे. दाऊदची ‘डी कंपनी’ पूर्णपणे दहशतवादी संघटना बनली असून तिचा हिंदुस्थानला सर्वात मोठा धोका आहे असा दावा हिंदुस्थानचे राजदूत सय्यद अकबरउद्दीन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेपुढे केला. तसेच डी कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

दाऊद हा पाकिस्तानचा आश्रय घेऊन गुन्हेगारी कारवाया घडवत आहे. पाकिस्तान मात्र त्याचे वास्तव्य नाकारत आहे. दहशतवाद पोसण्याच्या या भूमिकेवर हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेपुढे हल्ला चढवला. संयुक्त राष्ट्रातील हिंदुस्थानचे प्रतिनिधी अकबरउद्दीन यांनी सांगितले की, आम्ही दाऊदच्या गुन्हेगारी टोळीला दहशतवादी संघटनेमध्ये रूपांतरित होताना पाहिले आहे. डी कंपनीच्या सोने तस्करी, बनावट नोटांची छपाई, शस्त्र्ाs आणि अमली पदार्थांची तस्करी आदी कारवाया इतर देशांना कमी ठाऊक असतील. काही देशांना हे सर्व माहीत असूनदेखील ते कारवाईची हिंमत दाखवत नाहीत असा आरोप त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता केला.

आपली प्रतिक्रिया द्या