दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण, कराचीतील लष्कराच्या रुग्णालयात दाखल

2534

मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार व कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. दाऊद व त्याची पत्नी महजबीन या दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. त्या दोघांनाही कराचीतील लष्कराच्या रुग्णालयात भरती केल्याचे समजते.

दाऊद व त्याच्या पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या घरातील सदस्य व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दाऊद हा गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातील कराची येथे राहत आहे. मात्र  पाकिस्तान मात्र नेहमी या गोष्टीचा इनकार करत आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या