दाऊदचा हस्तक परवीन ताब्यात

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह 28 जणांवर एका खंडणी प्रकरणात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील आरोपी दाऊदचा हस्तक तारिक मर्चंट ऊर्फ तारिक परवीनला पोलिसांनी तळोजा कारागृह येथून ताब्यात घेतले.

खोटय़ा गुन्ह्यात अडकवून करोडो रुपये वसूल केल्याचा आरोप फिर्यादी सोनू जलान, केतन तन्ना व रियाज भाटी यांनी या प्रकरणात केला आहे. यामध्ये सिंग यांच्या इशाऱयावरूनच त्यांच्या सहकार्यांनी धमक्या देऊन आपल्याकडून कोटय़वधींची खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप फिर्यादींनी केला होता. याच गुह्यात तारिक आरोपी असून न्यायालयाने त्याला 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती फिर्यादींचे वकील अॅड. सागर कदम यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या