दूरदर्शनवर मुख्यमंत्र्यांचं भाषणच दाखवलं नाही

13

सामना ऑनलाईन, आगरतळा

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री भाषण करतात, हे भाषण दूरदर्शन आणि रेडियोद्वारे प्रसारीत केलं जातं. मात्र आपण केलेलं भाषण दाखवलंच नाही असा आरोप त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी केला आहे. या दोन्ही सरकारी सेवांनी सरकार यांना पत्र लिहून कळवलं होतं, की तुमच्या भाषणातील काही मजकूर बदला त्यानंतरच ते प्रसारीत केलं जाईल. यावर नाराज झालेल्या सरकार यांनी ही बाब अलोकतांत्रिक आणि असहिष्णू असल्याची टीका केली आहे.

त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांचं सरकार आहे, त्यामुळेच सरकारी प्रसारमाध्यमांकडून ही गळचेपी करण्यात येत असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युन्सिट पक्षाने केला आहे. सरकार यांचं भाषण १२ ऑगस्टला रेकॉर्ड करण्यात आलं होतं, यानंतर रेडिया आणि दूरदर्शनने त्यांना त्यांच्या भाषणात बदल करण्यास सांगितलं होतं. सरकार यांनी ते बदल न केल्यानं त्यांचं भाषणच दाखवण्यात आलं नाही.

tripura-cm-speech-controver

पंतप्रधानांनी देशाच्या विकासामध्ये राज्यांचं आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांचं महत्व किती आहे हे लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात सांगितलं. त्याच दिवशी हिंदुस्थानातील त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांची अशा पद्धतीने गळचेपी केल्यानं माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  ही हुकूमशाही आणि अघोषित आणीबाणी नाहीये तर मग दुसरं काय आहे असा सवाल त्यांनी विचारला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या