‘DDLJ’ची पंचविशी पूर्ण; पण चित्रपटात शाहरुखने ऋषी कपूर यांचा जुना स्वेटर का घातला माहिती का?

बॉलीवूडमधील ब्लॉकबस्टर रोमॅण्टिक चित्रपटांमध्ये पहिल्या काही चित्रपटात असणारा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’, चित्रपट पाहिला नसेल असा एकही चित्रपटप्रेमी नसेल. अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांच्या अजरामर भूमिकेमुळे हा चित्रपट आजही एवढ्या वर्षांनी चाहत्यांना आवडतो. जगभरात या चित्रपटाचे लाखो चाहते आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज 25 वर्ष पूर्ण झाली.

25 वर्षांपासून हा चित्रपट ‘दिलवाले’च्या मनावर राज्य करत आहे. यातील गाणी आजही चाहत्यांच्या जिभेवर रेंगाळतात. परंतु या चित्रपटाशी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचेही कनेक्शन होते हे तुम्हाला माहीत आहे का?

कपूर फॅमिलीमधील अनेक दिग्गज अभिनेत्यांपैकी एक म्हणजे ऋषी कपूर. त्यांनी अनेक रोमॅण्टिक चित्रपटात काम केले. ‘चांदणी’, ‘बॉबी’, ‘खेल खेल मे’ यासारखे त्यांचे चित्रपट तुफान गाजले. परंतु त्यांचे कनेक्शन ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ सोबत कसे जोडले गेले याबाबत निर्माता करण जोहर याने आपल्या बायोग्राफीमध्ये खुलासा केला आहे.

‘एन सूटेबल बॉय’ या पुस्तकात करण जोहर याने याबाबत खुलासा केला आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’च्या वेळेस आदित्य चोप्रा चित्रपटात वापरल्या जाणाऱ्या कपड्यांवर काम करत होता. त्यावेळी त्याला शाहरुख खान साठी विशेष कपडे हवे होते. ‘ना जाने मेरे दिल को क्या’ या गाण्याच्या शेवटी घालण्यासाठी हे कपडे हवे होते.

चित्रपटातील कपड्यासाठी काही खास बजेट नव्हते. त्यामुळे अधिक महागाचे कपडे खरेदी करणे अशक्य होते. त्यावेळी करण जोहर याने मुंबईतील आपल्या स्टुडिओत पडलेल्या जुन्या कपड्यांच्या पेट्या उघडल्या आणि शोधासाठी उचकापाचक सुरू केली. अखेर त्याच्या हाताला एक लाल आणि पांढऱ्या रंगाचा स्वेटर लागला.

screenshot_2020-04-24-15-03-21-330_com-android-chrome

हा तोच स्वेटर होता जो ऋषी कपूर यांनी सुपरहिट ‘चांदणी’ या चित्रपटात घातला होता. ऋषी कपूर यांच्या त्या स्टाईलने त्याकाळी तरुण मुलांना वेड लावले होते. हाच स्वेटर शाहरुखसाठी निवडण्यात आला. मात्र यात एक भोक होते आणि ते शिवूनच शाहरुखला घालायला देण्यात आले. त्या नंतर शाहरुखचा हा लूक करण आणि चाहत्याना देखील खूप आवडला.

screenshot_2020-04-24-15-03-16-236_com-android-chrome

आपली प्रतिक्रिया द्या