दहा दिवसांत ‘इंटरनेट’चे व्यसन सोडवणार!

43

सामना ऑनलाईन, गाजियाबाद

आपल्या नेहमीच्या कामांकडे दुर्लक्ष करीत काही जणांना इंटरनेटचे व्यसन जडले आहे, असे नेटिझन्स मानसिक आजाराचे शिकार बनत चालले असून अशा आहारी गेलेल्यांना इंटरनेटच्या अतिरेकी व्यसनातून मुक्त करण्यासाठी गाझियाबादमध्ये इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात आले आहे.गाझियाबादमध्ये या केंद्राचे मुख्यालय असून दिल्लीतील एम्स रुग्णालयात इंटरनेटचे व्यसन लागलेल्या व्यक्तींकरिता समुपदेशनाचे वर्ग घेतले जातात. तसेच व्हॉट्स ऍप आणि इंटरनेटची सवय जडलेल्या व्यक्तींना या सवयीपासून कसे दूर राहता येईल, याविषयी काही गोष्टी सांगितल्या जातात. या समुपदेशनामुळे १० दिवसांत इंटरनेटपासून रुग्ण व्यसनमुक्त होतो, असा दावा या केंद्राकडून करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या