पॅनकार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ

8

सामना प्रतिनिधी, नवी दिल्ली

पॅनकार्डला आधार लिंक करण्याची मुदत १ जुलैपर्यंत देण्यात आली होती. मात्र अद्याप अनेक जणांनी पॅनकार्डला आधार लिंक केलेले नाही. त्यामुळे पॅनला आधार लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. मुदतीत पॅन लिंक केले नाही तर पॅनकार्ड बाद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. मात्र ही मुदत वाढवण्यात आल्याने ज्यांनी पॅनला आधारकार्ड लिंक केले नाही त्यांना दिलासा मिळाला आहे.

१ जुलैपासून जीएसटी लागू होत असल्याने सरकारने पॅनला आधारकार्ड लिंक करणे सक्तीचे केले होते. मात्र पॅन आणि आधार लिंक करताना अनेक अडचणी येत आहेत. वेबसाइट ओपन होत नसल्याची अनेकांची तक्रार आहे. त्यामुळे आयकर विभागाने कार्ड लिंक करण्यास मुदतवाढ दिली आहे. मात्र याबाबतची अंतिम तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. लवकरच ही तारीख जाहीर करण्यात येईल असे आयकर विभागाने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या