मोदी सरकारचे दिवाळी गिफ्ट, महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय

3260
modi

दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये 5 टक्के वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. यापूर्वी त्यांना 12 टक्ते महागाई भत्ता मिळत होता. दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 60 लाख पेन्शनर्स लोकांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे सरकारवर 16 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

महागाई भत्त्यात दुसऱ्यांदा वाढ
गेल्या वर्षभरामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळातील अखेरच्या महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांनी पेन्शन धारकांनाचा महागाई भत्ता 12 टक्के केला होता. यापूर्वी महागाई भत्ता 9 टक्के मिळत होता. त्यावेळी घेतलेल्या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 9168.12 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडला होता. आता आणखी 5 टक्के वाढवल्याने सरकारच्या तिजोरीवरील ताण वाढणार आहे.

मंत्रिमंडळाचे अन्य निर्णय

  • ‘किसान सन्मान निधी’साठी आधार नंबर देण्याच्या तारखेत मुदतवाढ करण्यात आली. आता शेतकरी 30 नोव्हेंबरपर्यंत आधार नंबर देऊ शकतात. आधी 1 ऑगस्ट, 2019 ही अंतिम तारीख होती. ‘किसान सन्मान निधी’द्वारे सरकार शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांची मदत देते.
  • आशा कार्यकर्त्यांचे वेतन 1000 रुपयांना वाढवून 2000 रुपये करण्यात आले.

 

आपली प्रतिक्रिया द्या