अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

34
जळगाव – बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी सायंकाळी मेहरूण तलावावर आले होते. यातील दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृत विद्यार्थी नंदूरबारमधील वर्धमान नगरचे रहिवासी आहेत.
जळगाव – धुळे महामार्गावर असलेल्या बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील पाच विद्यार्थी मेहरूण तलावात आंघोळीसाठी आले होते. हे पाच विद्यार्थी तलावात उतरले. काही वेळानंतर तीन विद्यार्थी बाहेर आले मात्र निखिल विजय पाटील (१९) आणि भूषण प्रकाश पाटील (२१) हे दोघे वर आले नाही. पाण्यातून बाहेर आलेल्या विद्यार्थ्यांनी निखिल आणि भूषण बुडत असल्याचे बघितले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला पण तोपर्यंत खूप उशिर झाला होता. निखिल आणि भूषणचा बुडून मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या