राणीच्या बागेतील बाराशिंगाचा मृत्यू; नरासोबतच्या झुंजीत झाली होती जखमी

527

पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात गेल्या वर्षी आणलेल्या मादी बाराशिंगाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही मादी बाराशिंगा नरासोबत झालेल्या झुंजीत जखमी झाली होती असे समजते. त्याच्या मृत्यूबद्दल प्राणीप्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे.

मादी बाराशिंगाचा मृत्यू झाल्याने आता नर बाराशिंगाच राहिला आहे. त्यामुळे लवकरच त्याच्या सोबतीसाठी मादी बाराशिंगा आणला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. बाराशिंगा जोडी मे 2019 मध्ये कानपूरहून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आणली गेली होती. दरम्यान, मृत बाराशिंगाच्या शवविच्छेदनानंतरच तिचा मृत्यू कसा झाला याचे नेमवे कारण स्पष्ट होणार असल्याचेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. गेल्या आठकडय़ापासून बाराशिंगा जोडीमध्ये आपापसात झुंज लागत असल्याने मादी जखमी झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या