चरसच्या नशेमुळे एका भावाचा मृत्यू; दुसरा अत्यवस्थ

सामना ऑनलाईन । मुंबई

चरस आणि गांजाची नशा करणे दोघा भावांच्या चांगलेच अंगाशी आले. नशा करीत असताना सिगारेट पडून बिछान्याला लागलेल्या आगीत दोघे भाऊ गुदमरले. यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा अत्यवस्थ आहे. ही घटना कुर्ला येते घडली.

कुर्ला पश्चिमेकडील श्रीराम भुवन येथे राहणाऱ्या प्रदीप शुक्ला (४०) आणि सुदीप शुक्ला (३५) या दोघांना अमली पदार्थांचे व्यसन होते. गुरुवारी मध्यरात्री नशा करीत असताना पेटती सिगारेट गादीवर पडली. गादीमधून धूर निघू लागला. नशेत असल्याने दोघांनाही काय झाले समजले नाही. दरवाजा बंद असल्याने खोलीत प्रचंड धूर झाला आणि यामध्ये दोघेही गुदमरले. दोघांना तत्काळ भाभा रुग्णालयात नेण्यात आले. प्रदीपला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले तर सुदीपला उपचारासाठी शीव रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती कुर्ला पोलिसांनी दिली.