कापसाच्या ढिगा-याखाली दबून कामगाराचा मृत्यू

गेवराई येथील योगानंद जिनिंगमध्ये काम करणाऱ्या बाळासाहेब नामदेव कदम या तरुणाचा कापसाच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दुपारी बाराच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी येथील बाळासाहेब नामदेव कदम (29) योगानंद जिनिंगमध्ये कामाला होते. मंगळवार ट्रॅक्टरमधून आणलेला कापूस उतरवून घेण्यासाठी बाळासाहेब कदम गेले होते, पण ते परत आले नाहीत. म्हणून सर्व कामगारांनी त्यांचा शोधाशोध सुरू केली, पण ते कुठेच सापडले नाहीत. त्यानंतर काही वेळाने काही जणांना बाळासाहेब कदम कापसाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचे दिसले. ते बराच वेळ ढिगाऱ्याखाली अडकून पडल्याने त्यांचा तेथेच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

आपली प्रतिक्रिया द्या