‘त्या’ मुलाचा मृत्यू पुरामध्ये बुडून नाही, तर आईनेच फेकले होते पाण्यात

128

सामना ऑनलाईन । मुझफ्फरपूर

सोशल मीडियावर एका मृत चिमुरड्याचा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोसोबत एक मेसेज फिरत असून बिहारमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे या मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या फोटोवरून बिहारमधील राजकारणही तापले आहे. विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांनी धारेवर धरले आहे. परंतु या मुलाच्या मृत्यूचे कारण वेगळेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज तक‘ने दिलेल्या वृत्तानुसार, मुझफ्फरपूरमधील शितलपट्टीमधील मृत मुलाच्या ज्या फोटोवरून राजकारण गरम झाले आहे त्या मुलाचा मृत्यू पुराच्या पाण्यात बुडून झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलाला पाण्यात बुडवून मारण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

जिल्हाधिकारी आलोक रंजन घोष यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शितलपट्टी गावातील रिना देवी नावाच्या महिलेचे पतीसोबत भांडण झाले होते. पतीचा राग महिलेने मुलांवर काढला आणि मुलांना नदीमध्ये फेकले. तसेच स्वत: देखील आत्महत्या करण्यासाठी नदीमध्ये उडी घेतली. महिलेच्या मोठ्या मुलीने आईचे केस पकडून ठेवल्याने होते. गावकरी मदतीसाठी आले तेव्हा ती आईसोबत वाचली. परंतु मुलगा मात्र वाचू शकला नाही.

 rjd

आपली प्रतिक्रिया द्या