शिवभक्त तरुणाचा किल्ले रायगडवर मृत्यू; गड चढताना आला हृदयविकाराचा धक्का

शिवराज्याभिषेक सोहोळ्यासाठी किल्ले रायगडवर जात असलेल्या तरुणाचा शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ओंकार दीपक भिसे (वय 21, रा . संकेश्वर , ता हुकेरी, जि . बेळगाव, कर्नाटक ) असे मत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आपल्या मित्रांसह शुक्रवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास पायरी मार्गाने तो गडावर जात होता.

महादरवाजा येथे आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तातडीने पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्याला मृत जाहीर करण्यात आले. या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.