फाशीची शिक्षा सुनावलेले सर्वाधिक आरोपी लैंगिक अत्याचाराशी संबंधित, सर्वाधिक आरोपी उत्तर प्रदेशचे

गेल्या पाच वर्षात ज्या अरोपींना मृत्यूदंड सुनावण्यात आला आहे, त्यातील बहुतांश आरोपी हे लैंगिक अत्याचाराचे असल्याचे समोर आले आहे. एका अहवालात ही बाब समोर आली आहे.

राष्ट्रीय कायदा विद्यापीठाने हिंदुस्थानातील मृत्यूदंड हा अहवाल प्रकाशित केल आहे. या अहवालानुसार 31 डिसेंबर 2020 पर्यंत देशात 404 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यात सर्वाधिक आरोपी हे उत्तर प्रदेशचे आहेत.

अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार ज्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यापैकी 65 टक्के आरोपींवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. गेल्या वर्षी 77 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यापैकी 50 टक्के आरोपी हे लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक कराण्यत आली होती.

2019 मध्ये 103 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यापैकी 52 आरोपींवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. गेल्या 5 वर्षात लैंगिक अत्याचारात फाशीच्या शिक्षा सुनावण्याचे प्रमाण हे सर्वाधिक आहेत. 2019 साली निर्भया बलात्कार प्रकरणी मुकेश, विनय, अक्षय आणि पवन या चौघांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती.

कोरोना काळात कोर्टाच्या कामकाजावर खंड पडला होता. त्यामुळे सुनावणीसाठी वेळ लागला. 2020 मध्ये सत्र न्यायालयात 77 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर 2019 मध्ये 103 आरोपींनाअ फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या