चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीच

50
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

१२ वर्षांखालील चिमुरडीवर बलात्कार करणाऱया नराधमांना फासावरच लटकवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेऊन वटहुकूम काढण्याची तयारी केली आहे. कठुआ, उन्नाव, सुरत, इंदूर येथे निरागस बालिकांवर झालेल्या पाशवी बलात्कारांच्या घटनांमुळे अवघा देश हादरला असतानाच सरकारने हा निर्णय घेतला आहे.

प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट (पॉस्को) २०१२ या कायद्यानुसार अल्पवयीन बालिकांवरील बलात्काराच्या गुन्ह्यांसाठी किमान ७ वर्षांच्या तुरुंगवासाची आणि कमाल जन्मठेपेची शिक्षा आहे. यापुढे मात्र १२ वर्षांखालील बालिकांवरील लैंगिक अत्याचारांच्या गुह्यासाठी जन्मठेपेऐवजी फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. त्यासाठी ‘पॉस्को’ कायद्यात दुरुस्तीची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. दरम्यानच्या काळासाठी ती शिक्षा अमलात आणण्यासाठी अध्यादेश काढला जाणार आहे. तो अध्यादेश मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवला जाईल.

‘वटहुकूम’ म्हणजे काय?
जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू नसते, पण एखाद्या कायद्यात तातडीने बदल करायचा असतो. शिवाय संसदेद्वारे दुरुस्ती करेपर्यंत प्रतीक्षा करणे शक्य नसते. अशावेळी राज्यघटनेच्या कलम १२३ अनुसार वटहुकूम काढला जातो. त्याला राष्ट्रपती मंजुरी देतात. वटहुकूम हा तात्पुरता नियम असतो.

यूपीए – २ सरकारने पाच वर्षांत २३ वटहुकूम काढले .

– मोदी सरकारने २०१४ ते २०१७ या काळात ३४ वटहुकूम काढले आहेत.

– अध्यादेशाद्वारे ‘पॉक्सो’ कायद्यात आणि ‘विटनेस अॅक्ट’मध्येही दुरुस्ती करण्यात येणार आहे.

– भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि फौजदारी दंड संहिता (सीआरपीसी) मध्येही दुरुस्ती केली जाणार आहे.

– सध्या १२ वर्षांखालील बालिकांवरील बलात्काराच्या गुह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद असलेला कायदा मध्य प्रदेश, अरुणाचल, राजस्थान, हरयाणा या चार राज्यांत आहे.

rape-chart

आपली प्रतिक्रिया द्या