सेलिब्रिटी ‘आई’चा सवाल! लग्झरी हॉटेलात सिगारेट, दारूसाठी व्यवस्था, पण स्तनपानासाठी…

763
प्रातिनिधिक फोटो

मोठमोठ्या लग्झरी हॉटेलमध्ये प्राथमिक सोयीसुविधांसह सिगारेट आणि दारू पिण्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था असते. परंतु कोलकातामधील अशाच एका हॉटेलमध्ये एका आईला स्तनपान करण्यासाठी एक छोटीशी देखील जागा मिळाली नाही. यानंतर भडकलेल्या महिलेने सर्वच फाईव्ह स्टार हॉटेलला मुलांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र, स्वच्छ जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

प्रसिद्ध बंगाली संगीतकार द्रोणाचार्य यांची पत्नी देवोलिना आचार्य यांच्यसोबत हा किस्सा घडला आहे. कोलकातामधील फाईव्ह स्टार हॉटेल आयटीसी सोनार हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांकडे स्तनपान करण्यासाठीच्या रुमबाबत चौकशी केली. यावेळी कर्मचाऱ्याने इथे अशी कोणतीही स्वतंत्र रुम नसल्याचे सांगितले तेव्हा त्यांना धक्का बसला. यानंतर देवोलिना यांनी फेसबुकवर आपले तक्रार मांडली.

दोन महिन्यांच्या मुलीला मला स्तनपान करावयाचे होते, परंतु हॉटेलमध्ये अशी कोणतीही व्यवस्था नव्हती. ज्या हॉटेलमध्ये सिगारेट आणि दारू पिण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असते तिथे तान्ह्या बाळांना स्तनपानासाठी एकही जागा नाही. मी हॉटेल कर्मचाऱ्यांना एखादी जागा देण्याची विनंती केली, परंतु त्यांनी नकार दिला, असे देवोलिना यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले. तसेच या संदर्भात हॉलेटच्या प्रमुखांची बोलली असता त्यांनी चुकी मान्य केल्याचे त्यांनी म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या