महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी दीपक दळवी

47

सामना ऑनलाईन, कोल्हापूर

गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी आज दीपक दळवी यांची निवड करण्यात आली. शिवाय प्रथमच कार्याध्यक्षपद निर्माण करून त्यावर माजी आमदार मनोहर किणेकर यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ज्योती कॉलेजमध्ये यासाठी बैठक घेण्यात आली.

कानडी अत्याचाराला प्रतिकार करत मराठी भाषिकांना एकत्र आणण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची भूमिका असून या समितीच्या अध्यक्षपदी असलेले बेळगावचे माजी आमदार व लढवय्ये वसंत पाटील यांचे निधन झाल्याने समितीचे अध्यक्षपद गेल्या काही महिन्यांपासून रिकामेच होते. अखेर यासाठी आज बैठक घेऊन समितीवर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. बेळगावचे माजी महापौर मालोजी अष्टेकर आणि प्रकाश मरगाळे यांना समितीच्या खजिनदारपदी कायम ठेवण्यात आले. शिवाय निंगोजी हुद्दार, माजी आमदार दिगंबर पाटील, जयराम मिरजकर, रामदास राठोड यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या