माओवादी अटक प्रकरण – पुराव्यानंतरच कारवाई, दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नक्षलवाद्यांशी संपर्कात असल्याच्या माहितीवरून 5 संशयित शहरी माओवादी विचारांच्या अभासकांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली असून डाव्यांनी यानंतर सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वत:हून याची दखल घेत राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे.

भीमा-कोरेगाव हिंसाचार : ‘या’ 3 शहरी माओवाद्यांनी आधीही भोगलाय तुरुंगवास

‘अटक करताना पुणे पोलिसांनी नियमावलीचे पालन केले नाही असे प्रथमदर्शनी दिसत आहे. मानवी हक्कांचे हे उल्लंघन आहे, असे मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे. यानंतर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पुराव्यानंतरच ही अटक करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले असून या प्रकराणी सर्व सत्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोगापुढे मांडण्यात येईल असे म्हटले आहे.

नक्षल समर्थकांवरील कारवाई लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी! प्रकाश आंबेडकर

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी ज्यां लोकांना अटक केली आहे ती पुराव्याच्या आधारावर झाली आहे, असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. पुराव्याशिवाय अटक करण्यात आली नसती तर न्यायालयाने त्यांना कस्टडी नाकारली असती, असेही ते म्हणाले. तसेच या प्रकरणाचा कोणाला अवडंब करायचा असले तर त्याने करावा. आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन केले असून याची सर्व सत्य माहिती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगापुढे मांडली जाईल, असे केसरकर म्हणाले.

डाव्यांचा संताप
दरम्यान, पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर देशभरात डाव्यांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांची कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे. काँग्रेससह अन्य काही पक्षांनी मोदी सरकारचा हा हुकुमशाही आणण्याचा निर्णय असल्याचे म्हटले आहे. याविरोधात उद्या जंतर मंतरवर आंदोलन करण्यात येणार असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (मार्क्सवादी) नेते सिताराम येचूरी यांनी म्हटले आहे.