मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू करा! दीपक सावंत यांचे राज्यपालांना निवेदन

449

राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजकटीमुळे मुख्यमंत्री कैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन हा कक्ष सुरू करण्याची मागणी केली. राष्ट्रपती राजवट लागू असतानाही प्रचलित निर्णयांमध्ये बदल न करता हा निधी सुरू करता येऊ शकत असल्याचा दावा डॉ सावंत यांनी केला.

डॉ. सावंत यांनी राज्यपालांना तीन पर्याय सुचवले आहेत. ज्यामध्ये आलेल्या अर्जांची छाननी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव आणि संचालक वैद्यकीय शिक्षण यांच्या कमिटीने विहित वेळेत करावी तसेच महात्मा फुले जीवनदायनी योजनेमार्फत आवश्यक त्या शस्त्रक्रिया आणि उपचार करावेत, याशिवाय या रुग्णांना सरकारी नियमानुसार सर्वच रुग्णालयांमध्ये असलेल्या 10 टक्के आरक्षित कोटय़ानुसार उपचार करण्याचे आदेश दिले जावेत, असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. हे सर्व वेळेत आणि सोप्या पद्धतीने पार पाडण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या