अभिनेत्री दीपाली सय्यद करणार चित्रपट निर्मिती

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री नृत्यांगना दीपाली सय्यद आता निर्माती झाली आहे. तिची निर्मिती असलेल्या पहिल्या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच वैजापूर येथे संपन्न झाला. “ग्लोबल मीडिया कोर्पोरेशन”च्या श्रेयस कामले, राजेंद्र कामले यांच्यासोबत अभिनेत्री नृत्यांगना दीपाली सय्यद ह्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून अद्याप या चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात आहे. अशोक कामले, सुरेंद्र वर्मा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून लेखा त्रिलोक्य यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे.

हा चित्रपट राज, मिली आणि गौरी यांच्या एका अनवट प्रेमकथेभोवती फिरतो. खरं प्रेम, आयुष्य, नातेसंबंध, शहर आणि गावातलं जगणं, राजकारण यांचा वेध या चित्रपटातून घेण्यात येणार आहे. अनुपसिंग ठाकूर हा नवोदित अभिनेता चित्रपटातून पहिल्यांदाच प्रेक्षकांपुढे येणार आहे. अनुपने या पूर्वी महाभारत ही मालिका, कमांडो हा हिंदी चित्रपट आणि दक्षिणेतील काही चित्रपट केले आहेत. त्याच्यासह गजनी फेम प्रदीप रावत, दीपाली सय्यद, वर्षा उसगावकर, उदय टिकेकर, पंकज विष्णू, अपूर्वा कवडे, दिलीप वाघ, साहेबराव पाटील यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या