‘छपाक’नंतर आता ‘या’ चित्रपटाची निर्मिती करणार दीपिका

705
deepika-padukone

अॅसिड हल्ल्याच्या पीडितांवरील दीपिकाचा ‘छपाक’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. व्यावसायिक पातळीवर चित्रपटाला फारसं यश मिळालं नसलं तरी सामाजिक पातळीवर या चित्रपटाचं प्रचंड कौतुक झालं. असा संवेदनशील विषय समर्थपणे हाताळल्याबद्दल अभिनेत्री आणि निर्माती या दोन्ही भूमिकांसाठी दीपिकाची प्रशंसा झाली. आता या चित्रपटाच्या निर्मितीनंतर दीपिका अजून एका चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

या चित्रपटाचं नाव ‘द इंटर्न’ असं असणार आहे. या चित्रपटात दीपिकासोबत ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूरही झळकणार आहेत. ऋषी आणि दीपिका यांनी यापूर्वी ‘लव्ह आज कल’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. दीपिकाने तिच्या ट्विटर हँडलवरून या चित्रपटाची घोषणा केल्याचं ट्वीट केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती दीपिका, वॉर्नर ब्रदर्स, एज्युर असे तीन निर्माते करणार आहेत. पुढील वर्षी म्हणजे 2021मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या