पद्मावतीसाठी दीपिकाने घेतले ११ कोटी

सामना ऑनलाईन, मुंबई

संजय लीला भंसाळी यांची मोस्ट अवेटेड फिल्म पद्मावतीचा फर्स्ट ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच त्याच्यातील भव्यदिव्यतेची चर्चा सुरू झाली आहे. तब्बल १५० कोटींचे बजेट असणाऱ्या या चित्रपटासाठी दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, शाहीद कपूर यांनी मानधन देखील तेवढेच तगडे घेतले आहे. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत कायमच चित्रपटातील अभिनेत्यापेक्षा अभिनेत्रीला कमी मानधन दिले जायचे मात्र पद्मावतीसाठी दीपिकाला चित्रपटातील दोन्ही अभिनेत्यांपेक्षा दुप्पट मानधन देण्यात आले आहे.

दीपिकाने राणी पद्मावतीच्या भूमिकेसाठी तब्बल ११ कोटी घेतले आहेत. शाहीद कपूरला राजा मानसिंगच्या भूमिकेसाठी ७ कोटी देण्यात आले आहेत. तर अल्लाउद्दीन खिलजीच्या व्यक्तीरेखेसाठी रणवीर सिंगला ६ कोटी देण्यात आले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री अदिती राव हैदरी मेहरुन्निसा भूमिकेत दिसणार आहे . त्यासाठी अदितिला ८५ लाख रुपये दिले आहेत.

या चित्रपटातील दीपिकाच्या प्रत्येक लूकमधील लेहेंगा व दागिने हे जवळपास ३० किलो वजनाचे असून त्यावर तब्बल एक कोटी खर्च करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या