दीपिकाला मिळाला काहीतरी खाण्याचा सल्ला!

24

सामना ऑनलाईन । मुंबई

सोशल मीडियाने आज कित्येक गोष्टी सहज झाल्या आहेत. बॉलिवूडकरांना याचा विशेष फायदा होतो. चित्रपटांच्या प्रमोशनसाठी, चाहत्यांशी जोडून राहण्यासाठी ते सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करतात. पण, कधीकधी ही गोष्ट अंगलटही येऊ शकते. असंच काहीसं झालंय अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या बाबतीत. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक फोटो शेअर केला. मात्र त्यावर नेटकऱ्यांनी तिला पाहून ‘खूप बारीक आहेस, काहीतरी खात जा..’ असा सल्ला दिला आहे.

वॅनिटी फेअर युके या मॅगझिनसाठी तिने एक फोटोशूट केलं होतं. त्या फोटोशूटमधला एक फोटो तिने चाहत्यांसाठी शेअर केला. त्यात तिने एक काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिच्या गळ्यात एक सुंदर नेकलेसही दिसत आहे. पण, तिच्या चाहत्यांना मात्र तिचा हा फोटो काही आवडला नाही. त्यांनी तिला तिच्या बारीक असण्यावरून ट्रोल करायला सुरुवात केली. कोणी तिला कुपोषित म्हटलं तर कुणी मृतदेह.. अर्थात हा फोटो आवडणाऱ्या नेटकऱ्यांनी तिची बाजू लावून धरली. यापूर्वीही दीपिकाने असाच एक बोल्ड फोटो टाकला होता. त्यावरही नेटकऱ्यांनी तिला असंच ट्रोल केलं होतं.

@vanityfair @vanityfairuk

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

आपली प्रतिक्रिया द्या