दीपिका म्हणतेय ‘कुछ तो है तुझसे राबता’

सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या काही दिवसांपूर्वी सुशांतसिंग राजपूत आणि क्रिती सेनन यांच्या आगामी राबता या चित्रपटासंबंधी कळलं होतं. पण, यात नेमकी दीपिका कुठे आली? असा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल. हो, हा तोच राबता हा चित्रपट आहे. मात्र, या चित्रपटात दीपिका ‘राबता’ या चित्रपटाच्या टायटल साँगमध्ये थिरकताना दिसणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होते. त्या ट्रेलरवरून ही पुनर्जन्मावर आधारित प्रेमकथा असल्याचं दिसून येत आहे. दिनेश विजन निर्मित- दिग्दर्शित ‘राबता’ ही एक प्रेमकहाणी आहे. टीसीरिज आणि मॅडॉक फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘राबता’ येत्या ९ जून रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा राबता हे टायटल साँग-

आपली प्रतिक्रिया द्या