दीपिका पदूकोण ही तुकडे तुकडे गँगची सदस्य, भाजप खासदाराची टीका

2462

जेएनयूत झालेल्या हल्ल्याच्या विरोधात निदर्शने करत असलेल्या विद्यार्थ्यांना अभिनेत्री दीपिका पदुकोणने भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या हल्ल्याचा निषेध करत तिने विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावरून भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी दीपिकावर निशाणा साधला असून ती तुकडे तुकडे गँगची सदस्य असल्याचे म्हटले आहे.

sakshi-maharaj

उन्नावचे खासदार असलेले साक्षी महाराज यांनी एका मुलाखतीत दीपिकावर टीका केली आहे. दीपिकाच्या भेटीविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘मला असे वाटते की ते तुकडे तुकडे गँगचे सदस्य आहेत. या सर्वांना काही परदेशी शक्तींचा पाठिंबा आहे’, असे साक्षी महाराज यांनी सांगितले.

deepika-in-jnu

नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री काही समाजकंटकांनी हल्ला केला. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. जेएनयूसारख्या विद्यापीठावर हल्ला होणे, ही खेदाची बाब असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या