दीपिका पदुकोणने रणवीरला केलं किस; पाहा व्हायरल व्हिडीओ

1775

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग. चित्रपट असोत किंवा वास्तविक जीवन दोघे नेहमीच एकमेकांसोबत चांगलेच दिसतात. सध्या दोघेही लॉकडाऊनमध्ये घरी एकत्र वेळ घालवत आहेत. अशातच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या दीपिकाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती रणवीरला किस करताना दिसत आहे.

दीपिका पदुकोणने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये ‘जगातला सर्वात प्रेमळ चेहरा, क्यूटी’, असं लिहिलं आहे. दीपिका नेहमीच रणवीर आणि तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. लॉकडाऊनमध्ये तिने स्वयंपाकघरातील विविध पदार्थांचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, दीपिकाने पोस्ट केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


View this post on Instagram

World’s Most Squishable Face!!! #cutie @ranveersingh

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

आपली प्रतिक्रिया द्या