दीपिका-प्रियांका ठरल्या ‘हॉट वुमन ऑफ द इयर’

128

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलीवूडची ‘मस्तानी’ म्हणजेच दीपिका पडुकोण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या चर्चेचं कारण रणवीर सिंग नसून तिनं मिळवलेलं यश आहे. कारण दीपिका ‘हॉट वुमन ऑफ द इयर’ ठरली आहे. स्वत: दीपिकानं आपल्या फेसबूक पेजवर मॅक्सिम साप्ताहिकाच्या फोटोची पोस्ट टाकून अशी माहिती दिली आहे.
फॅशन मासिक ‘मॅक्सीम’च्या २०१७ मधील टॉप १०० हॉट वुमेन यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात बॉलीवूच्या दीपिका पडुकोण आणि प्रियांका चोप्रा यांचा समावेश आहे. या यादीत स्थान मिळाल्याचे दोघीही आनंदीत आहेत.
दोघीही सध्या हॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडत आहेत. ‘ट्रिपल एक्स : जेंडर केज’या चित्रपटातून दीपिकाने हॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. गेल्यावर्षी फोर्ब्सनं जाहीर केलेल्या यादीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टॉप १० अभिनेत्रींमध्ये दीपिकाचा समावेश होतो.

आपली प्रतिक्रिया द्या